नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्युमुळे बॉलिवूडच नाही तर चाहत्यांनाही एक मोठा धक्का बसला. सर्वत्र श्रीदेवी यांच्याच बातम्या प्रसारित होत होत्या. मात्र, याच दरम्यान श्रीदेवी यांच्यासोबत काम केलेले अभिनेते ऋषी कपूर चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं.


ट्विटरवरून व्यक्त केला संताप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांच्या निधनानंतर प्रसारमाध्यमांनी केलेल्या रिपोर्टिंगवर अभिनेते ऋषी कपूर भडकले. त्यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे.


प्रसारमाध्यमांवर भडकले ऋषी कपूर


ऋषी कपूर यांनी प्रसारमाध्यमांकडून वापरण्यात येणाऱ्या शब्दांवर आक्षेप नोंदवलाय. पाहूयात ऋषी कपूर यांनी नेमकं काय म्हटलं आहे.


अभिनेते ऋषी कपूर यांनी रविवारी ट्विट करत म्हटलं की, "अचानकपणे श्रीदेवींचा मृतदेह म्हणून संबोधले जात आहे. सर्व टीव्ही चॅनल्स वृत्त प्रसारित करत आहेत की बॉडी आज रात्री मुंबईत येणार. श्रीदेवींच्या पार्थिवाला अचानक मृतदेह म्हणून संबोधले जात आहे."



ट्विटरवरुन वाहिली श्रद्धांजली


श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी कळताच अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केलं. ऋषी कपूर यांनी म्हटलं की, "सकाळ दुख:द बातमीने झाली, बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुलींबरोबर आमची सहानभूती आहे." 



श्रीदेवी यांच्या निधनानंतर एक फोटो शेअर करत ऋषी कपूर यांनी म्हटलं, "आता चंद्रप्रकाशातील रात्री होणार नाही. कारण,  'चांदनी' कायमची निघून गेलीय'.



१९६३ मध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी १९६७ साली एक बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीदेवीने हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमांतही काम केलं आहे. श्रीदेवीला २०१३ साली सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले.