मुंबई : बॉलिवूडचे अभिनेते ऋषी कपूर, ट्विटर आणि वाद हे समीकरण ठरलेले आहे. आता पुन्हा ऋषी कपूर वादामध्ये अडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूडची अभिनेत्री बियॉन्सेची ऋषी कपूरने खिल्ली उडवली होती. प्रेग्नंट बियॉन्सेचा फोटो शेअर करताना ऑरेन्ज कपड्यामधील बियॉन्से फूलदाणीप्रमाणे वाटतेय असे कॅप्शन लिहून त्यांनी फोटो शेअर केला होता. 


ऋषी कपूरसाठी हा केवळ मस्करीचा भाग वाटत असला तरी ट्विटरकर मात्र त्यांच्या खिल्लीवर नाराज झाले आहेत. 


का झाले ट्रोल ? 


'राजमा चावल' चित्रपटासाठी ऋषी कपूर दिल्लीमध्ये आहेत. शूटिंग दरम्यानचा वेळ काढून त्यांनी जामा मशीदीमधील एक फोटो शेअर केला. सोबतच ईद च्या शुभेच्छा दिल्या. 



 


ट्विटरवर प्रतिक्रिया 


ऋषी कपूरच्या फोटोंवर काही वादग्रस्त प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. लवकरच तुम्ही पाकिस्तानामध्येही जाणार आहात.. त्यासाठी शुभेच्छा अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. ट्विटरकरांनी त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.   


काही दिवसांपूर्वी भारत- पाक सीमा आणि काश्मिरप्रश्नी ट्विट करूनही त्यांनी नवा वाद ओढावला होता.