मुंबई : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू कपूर 1980 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये ऋषी कपूर यांच्यासमोर एक मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन उभी आहे. ही मुलगी ९० च्या दशकात बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. तूम्हाला ही अभिनेत्री ओळखता येतेय का बघा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोत काय? 


ऋषी आणि नीतू कपूरच्या लग्नाचा एक न पाहिलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोत लग्नाचा पोशाख परिधान करून ऋषी कपूर आणि नीतू कपूर स्टेजवर उभे आहेत. त्याचवेळी ऋषीसमोर एक छोटी मुलगी उभी आहे. चित्रात आपल्या गोंडस हास्याने लोकांची मने जिंकणारी ही मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आहे. रवीना टंडन 90 च्या दशकात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत होती. त्या काळात तिने प्रत्येक मोठ्या निर्माता-दिग्दर्शकासोबत आणि अभिनेत्यांसोबत काम केले आहे.


रवीना टंडन अलीकडेच ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF Chapter 2' मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथचे सुपरस्टार यश आणि संजय दत्त दिसला होता. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडल्याची माहीती आहे. या सिनेमाचा आता तिसरा भाग देखील येणार आहे.या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.