नवी दिल्ली : वादग्रस्त ट्विट आणि कमेंट्स करुन चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर चांगलेच ट्रोल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पद्मावत' प्रकरणी ट्विट करणे त्यांना महागात पडले. त्यानंतर त्यांना हे ट्विट काढून टाकावे लागले.


फोटो ट्विट 


ऋषि कपूर यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून रणवीर सिंह आणि करण जोहर यांचा एक फोटो ट्विट केला. ''रणवीर सिंहने घोषणा केली की जर करणी सनेने 'पद्मावत' रिलीज होऊ दिला नाही तर तो जौहर करेल.' असे त्यावर लिहिले.


ट्विट डिलीट 



खरतर रणवीर आण करण जोहर यांच्यावर निशाणा साधला. पण पद्मावत प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव झाल्यावर त्यांनी ते ट्विट डिलीट केले.


महिला करणार होत्या जौहर 


जर हा सिनेमा रिलीज झाला तर आम्ही जौहर करु असे उदयपुरमधील राजपूत महिलांनी जाहिर केले होते. हा धागा पकडत  ऋषि कपूर यांनी खिल्ली उडविली होती.