Video: संजूचा ट्रेलर पाहून हैराण झाले ऋषि कपूर
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सिनेमा संजूच्या टीझरने युट्यूबवर चांगलीच धमाल उडवून दिली. संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.
मुंबई : दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सिनेमा संजूच्या टीझरने युट्यूबवर चांगलीच धमाल उडवून दिली. संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या टीझरपासून ते पोस्टरपर्यंत रणबीरचा लूक जबरदस्त दिसतोय. या सिनेमाची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे. या सिनेमाचा ट्रेलर रणबीरचे आई-वडिल अर्थात ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांना पहिल्यांदा दाखवला गेला. आपल्या मुलाला या ट्रेलरमध्ये पाहिल्यावर ऋषि कपूर चांगलेच हैराण झाले.
इतकंच नव्हे तर हा ट्रेलर पाहून ऋषी कपूर यांनी नीतू कपूरच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, तुझी शप्पथ मला हा संजय दत्तच वाटला. संजूचा ट्रेलर ३०मेला रिलीज होतोय. या ट्रेलरआधी ऋषी कपूर यांनी अशी प्रतिक्रिया दिल्याने सिनेमाची उत्सुकता अधिक ताणली गेलीये.
संजू हा सिनेमा २९ जूनला सर्व थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीरशिवाय सोनम कपूर, परेश रावल, मनीष कोईराला, दिया मिर्झा, विक्की कौशल आणि अनुष्का शर्मा आहेत.