मुंबई : राजकुमार हिरानींचा 'संजू' हा यंदाच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. हा चित्रपट संजय दत्तच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटातील ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे. संजय दत्तप्रमाणे दिसण्यासाठी त्याने केलेल्या मेहनतीचेही अनेकांनी कौतुक केले आहे. 


ऋषी कपूर भडकले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'संजू' चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर काहींनी कौतुक केले तर काही प्रेक्षकांनी टीकाही केली. अशाच एका चाहत्याच्या नकारात्मक प्रतिक्रियेवर ऋषी कपूर भडकले होते. 
'संजू' हा चित्रपट म्हणजे बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असलेल्या एका अभिनेत्याची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे मत चाहत्यांने ट्विटरवर मांडले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ऋषी कपूर यांनी थेट ट्विट करण्याऐवजी एक मेसेज पाठवला. 



काय होती ऋषी कपूरची प्रतिक्रिया 


सिनेमा हे मनोरंजनाचे माध्यम आहे. आम्ही प्रतिमा सुधारण्याचे काम करत नाही. तुम्हांला सिनेमामधील काय समजतं? असा प्रश्न विचारत ऋषी कपूर यांनी चाहत्याची कानउघडणी केली आहे. 


@ClassicFergie या अकाऊंटमधून हे ट्विट केले होते. मात्र काही दिवसांनी ते काढूनही टाकले आहे. 


'संजू' बाबत उत्सुकता 


संजय दत्तचा जीवनपट दाखवणार्‍या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर सोबत मनीषा कोईराला, परेश रावल, सोनम कपूर, दीया मिर्जा, विकी कौशल, जिम सरभ आणि करिश्मा तन्नादेखील आहेत.