रणबीरने आलियाशी नाही तर `या` व्यक्तीसोबत लग्न करावं, ऋषी कपूर यांची इच्छा
रणबीर कपूर आणि अभिनत्री आलिया भट्ट गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनत्री आलिया भट्ट गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. कोणत्याही कार्यक्रमामध्ये किंवा पार्ट्यांमध्ये दोघे कायम एकमेकांसोबत असतात. त्यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असल्यामुळे त्यांना लग्न कधी करणार असा प्रश्न कायम विचारला जातो. पण चाहत्यांच्या या प्रश्नावर आलिया आणि रणबीरने अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. आलिया आणि रणबीरचं नातं संपूर्ण कपूर कुटुंबाला मान्य आहे.
पण आलियाशी नाही तर बेस्टफ्रेन्ड फिल्ममेकर अयान मुखर्जीसोबत लग्न रणबीरने लग्न करावं अशी दिवंगत अभिनेते ऋषि कपूर(Rishi Kapoor)यांची इच्छा होती. सोशल मीडियावर ऋषी कपूर यांनी सल्ला दिला होता की, रणबीरने बेस्टफ्रेन्ड अयान मुखर्जीसोबत लग्न करावं. ऋषी कपूर यांनी दोघांचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला.
अयान आणि रणबीरचा फोटो शेअर करत ऋषी कपूर म्हणाले, 'बेस्टफ्रेन्ड... कसं होईल जर तुम्ही दोघांनी लग्न केलं? हाय टाईम...' सध्या ऋषी कपूर यांची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर आयान आणि रणबीरने एकत्र 'वेक अप सिड' या चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटापासूनचं त्यांच्या मैत्रीचा प्रवास सुरू झाला.
अयान आणि रणबीर कायम एकमेकांच्या चांगल्या-वाईट परिस्थितीत एकत्र असतात. दोघे अनेकदा सुट्ट्यांसाठी सुद्धा बाहेर जातात. 'वेक अप सिड' चित्रपटानंतर अयान आणि रणबीर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. यामध्ये आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.