मुंबई : रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख हे बॉलीवूडमधील सर्वात सुंदर कपलपैकी एक आहेत. अनेकदा हे कपल सोशल मीडियावर स्वत:चे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. ज्यामध्ये त्यांच्या मुलांचाही समावेश असतो. आज, जेनेलिया देशमुखने सोशल मीडियावर असाच काहीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संपुर्ण देशमुख कुटूंब दिसत आहे.  आगामी हॅलोविनसाठी तिच्या कुटुंबाच्या तयारीची झलक जिनिलियाने शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी संपूर्ण कुटुंबाने ममीसारखे कपडे घातलेले दिसत आहे. जेनेलिया देशमुखने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिचं कुटुंब हॅलोविनची तयारी करत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये, रितेश देशमुख तिच्या हातावर बँडेज बांधताना दिसत आहे याचबरोबर तिने याला कॅप्शनमध्ये लिहीलं, "@riteishd काय करत आहे?" यानंतर तिच्या दुसऱ्या स्टोरीमध्ये  तिची दोन मुलंही सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, "आता इतर 2 देशमुख देखील सामील झाले आहेत?"


जिनिलिया आणि रितेश यांनी बँडेज बांधली
या पुढे तिने एक सेल्फी  शेअर केला आहे ज्यात जेनेलिया, रितेश देशमुख आणि त्यांची दोन्ही मुले ममीसारखी पूर्णपणे पट्टी बांधलेली दिसत आहेत. "हॅलोवीन टाइम" असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. गेल्या आठवड्यात ती तिच्या दोन मुलांना रायन आणि राहिल यांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी घेऊन गेली होती. हे कुटुंब फुटबॉल मैदानाबाहेर स्पॉट झालं होतं. जिथे त्यांची मुल फुटबॉल प्रशिक्षणात गुंतले होते. फोटोग्राफर्सने त्यांना पोज देण्याची विनंती केल्यानंतर कुटुंबाने पापाराझींनी कॅमेरासमोर पोजही दिल्या. यानंतर रायन आणि राहिलने पापाराझींना हात जोडून नमस्कारही केला.  अनेकांनी त्यांच्या मुलांचं हे कृत्य पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.



ट्रायल पीरियडमध्ये दिसली अभिनेत्री
जिनिलिया नुकतीच कॉमेडी-ड्रामा फिल्म ट्रायल पीरियडमध्ये दिसली होती. 'सितारे जमीन पर'मध्ये ती आमिर खानसोबत दिसणार आहे. दोन्ही कलाकारांनी तयारी सुरू केली असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, रितेशने 2022 मध्ये आलेल्या वेड या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. तो पुढे हॉरर कॉमेडी काकुडा, विस्फोट आणि हाउसफुल 5 मध्ये झळकणार आहे. रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख आणि महेश मांजरेकर त्यांच्या आगामी 'मिस्टर मम्मी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी होणार आहे.