रितेश आणि जेनेलियाच्या भांडणाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल!
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत दोघेही भांडताना दिसताहेत.
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत दोघेही भांडताना दिसताहेत.
सोशल मीडियात अॅक्टीव्ह
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा-देशमुख ही जोडी नेहमीच चर्चेत असते. आता तर त्यांना दोन मुले झाल्याने ते दोघे त्यांच्या व्यस्त आहेत. तरीही ते त्यातून वेळ काढून चाहत्यांसाठी सोशल मीडियावर येत असतात.
दोघांचं ‘भांडण’
या दोघांचं हे खरंखुरं भांडण नाहीये तर दोघांनी त्या सीनवर अॅक्टींग केलीये. या व्हिडिओत रितेश देशमुख आणि जेनेलिया शाहरूख खान आणि काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील भांडणाचा सीन करताना दिसत आहेत. ‘राहुल इज अ चिटर’ असं म्हणत जेनेलिया त्याला चिडवत आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच पसंत केला जात आहे.