मुंबई : अभिनेता रितेश देशमुख बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीचा महत्त्वाचा चेहरा आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांसोबतचं कलाकारांनी देखील रितेशच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. शिवाय सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असलेल्या रितेशचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रितेश तिच्या जिम ट्रेनरसमोर हात सोडताना दिसत आहे. रितेशच्या या व्हिडिओमुळे चाहते आणि सेलिब्रिटी देखील हैराण झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तो जिम ट्रेनरसमोर हात जोडताना दिसत आहे. रितेश एक्सरसाइस करण्यास सुरूवात करतो. ज्यामुळे त्याला वेदना होत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, 'मला जावू द्या माझी आई प्रतीक्षा करत आहे.' रितेशचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)


रितेशच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरचं 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एवढंच नाही तर रितेशचे मराठी चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. 'ककुदा' मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.