Riteish Deshmukh Love Politics: मराठमोळा बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकत्याच आलेल्या वेड चित्रपटामुळे (VED Movie) रितेशला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणी कुटुंबात (Political Background) जन्म घेतलेल्या रितेशने चित्रपटसृष्टीत खूप मेहनत देखील घेतलीये. रितेशचे दोन्ही भाऊ राजकारणात आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत दोन्ही भावांनी एकामागून एक एन्ट्री केली होती. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत रितेश देशमुख राजकारणात (Will Riteish Deshmukh enter politics?) येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यावर आता रितेश देशमुखने उत्तर दिलंय. 


काय म्हणाला Riteish Deshmukh ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणाची मला आवड आहे. राजकारणाची (Maharastra Politics) मला जाणीव आहे, त्यामुळे त्याला पहिलं प्रेम म्हणता येईल. राजकारणाबद्दल मला आवड आहे आणि मला आपुलकी आहे, असं रितेश देशमुख (Riteish Deshmukh) म्हणाले. घराशाहीचा वाद नको, त्यामुळे जी काही स्वप्न आहेत, ती चित्रपटाच्या कॅरेक्टरमध्ये करेल, ते काम सोप्पं आहे, असं म्हणत रितेश देशमुख यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.


रितेश देशमुख (Riteish Deshmukh) कधीच राजकारणात जाणार नाही? असा सवाल केल्यावर, भविष्यात काय होईल काहीच माहीती नसतं, असं सुचक वक्तव्य रितेश देशमुख यांनी केलंय. त्याचबरोबर रितेश लातूरमधून खासदार (Latur MP) होतील का? असा प्रश्न विचारला असता, राखीव आहे जागा, असं म्हणत मुद्दयाला पायवाट दाखवली.


आणखी वाचा - Honey Singh On Shah Rukh Khan: "मी शाहरूख खानला स्पष्टच सांगितलं...", लुंगी डान्स गाण्यावर हनी सिंहचा खुलासा!


दरम्यान, मला अॅक्टर व्हायचं नव्हतं. ती संधी मला मिळाली, मी चित्रपट केला. आज 20 वर्ष झालं मी चित्रपटात काम करतोय. लोकांना भरभरून प्रेम दिलं. जे मी काम करतोय त्यावर मात्र प्रेम आहे आणि तेच काम मरेपर्यंत करावं, अशी माझी इच्छा आहे, असं वक्तव्य देखील रितेश देशमुखने केलंय. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत रितेश देशमुख यांनी रितेश आणि जेनिलिया (Riteish Deshmukh - Genelia Deshmukh) यांची लव स्टोरी देखील सांगितली.