मुंबई : केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी #HumFitToIndianFit चॅलेंज दिलेलं व्हिडिओ व्हायरल झालं होतं. या चॅलेंजने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. यामध्ये अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी सहभाग घेतला . आता स्टार किड देखील हे चॅलेंज स्विकारताना दिसत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलियाचा मुलगा राहिलने हे फिटनेस चॅलेंज दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर राहिलचा फिटनेस व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. जेनेलियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. राहिलने आपले वडिल म्हणजे अभिनेता रितेश देशमुखचं एक फिटनेस चॅलेंज एक्सेप्ट स्विकारल आहे. आता त्याने आपल्या बच्चा गँगला चॅलेंज दिलं आहे. @BachceFitTohDeshFit 



या व्हिडिओच्या शेवटी राहिलने तैमूर, अली खान, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य, करण जोहरची जुळी मुलं यश आणि रूही तसेच सलमान खानचा भाचा आहिलला चॅलेंज दिला आहे. तसेच अजय देवगन आणि काजोलच्या मुलाने देखील हे फिटनेस चॅलेंज स्विकारलं आणि ते पूर्ण देखील केलं आहे.