मुंबई : निर्भयाप्रमाणेच गुजरातमध्ये देखील एक गँगरेपची घटना समोर आली आहे. एका दलित मुलीवर बलात्कार करून तिचं शव झाडावर लटकवण्यात आलं होतं. 19 वर्षीय तरूणीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात चौघजण दोषी असल्याच सांगण्यात येत आहे. या प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून न्यायाची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश देशमुखने ट्विट केलंय की,'19 वर्षीय तरूणीचं अपहरण, सामुहिक बलात्कार, हत्या आणि मग झाडावर लटकवंल. विसरून जा की ती तरूणी कोणत्या धर्माची आहे? किंवा ती कोणत्या जातीची आहे. फक्त हे लक्षात ठेवा की, ती एक तरुण मुलगी होती जिच्यासमोर संपूर्ण आयुष्य आशा आणि आकांक्षांनी भरलेलं होतं. आरोपींना फाशीवर लटकवा'. अशा पद्धतीचं ट्विट रितेशने केलं आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरपासून ही तरूणी हरवली होती. रविवारी या मुलीचा मृतदेह सापडला. 3 जानेवारी रोजी पीडितेचे कुटुंबिय पोलिसात तक्रार दाखल करायला गेले होते. मात्र पोलिसांनी तक्रार लिहून न घेता तरूणीच कोणत्यातरी मुलासोबत गेली आणि तिने त्यासोबत लग्न केलं. आता ती सुखरूप आहे असं पोलिसांनी सांगून तक्रार नोंदवली नाही. पण 5 जानेवारी रोजी पीडित तरूणीचा मृतदेह एका झाडावर लटकलेल्या रुपात आढळला.