Maharashtracha Favourite Kon: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh Deshmukh) आजवरच्या त्याच्या प्रत्येक मराठी सिनेमात एक स्टाईल आणली आहे ज्यामुळे त्याचे चाहते नेहमीच त्याची मराठीतील झलक पाहण्यासाठी वेडे असतात. रितेशचं हेच 'वेड' (Ved Marathi Movie) झी टॉकीजच्या मंचावर खास शाब्बासकी मिळवणार आहे. झी टॉकीज वाहिनीतर्फे (Zee Talkies) घेण्यात आलेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण (Maharashtracha Favourite Kon Show) या स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात रितेशचा खास गौरव होणार आहे. वेड या सिनेमातून मराठी बॉक्सऑफिसवर कोट्यावधींची कमाई करून मराठी सिनेमाला कोटींच्या क्लबमध्ये नेणाऱ्या रितेशला झी टॉकीजतर्फे फेव्हरेट स्टाईल आयकॉन पुरस्कार देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वेड' या  मराठीतील हिट सिनेमासाठी महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण 2022 या पुरस्कारानेही रितेशला गौरवण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीतूनच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कारावर नाव कोरलेल्या कलाकारांना या सोहळ्यात गौरवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे. बॉलिवूडमध्ये स्थिरावलेले मराठी कलाकार मुलाखतीमध्ये अनेकदा, मला मराठी सिनेमा करायला आवडेल. चांगली भूमिका मिळाली तर मी मराठी सिनेमाला प्राधान्य देईन. 


कथा छान असेल तर मला मराठी सिनेमाची निर्मिती करायची आहे असं म्हणत असतात. तर काहीवेळा हिंदी कलाकारही मराठी सिनेमासाठी निर्मात्याची भूमिका करायला उत्सुक असतात. यामध्ये बाजी मारली आहे ती बॉलिवूड अभिनेता असूनही मराठीशी नाळ जोडून ठेवणाऱ्या रितेश देशमुख याने. 31 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या वेड या सिनेमातून त्याने दिग्दर्शनात टाकलेलं पहिलं पाऊल, त्याची पत्नी अभिनेत्री जिनीलीया डिसूझा हिचं मराठीतील पदार्पण या वेड सिनेमाच्या खास गोष्टी आहेत.
 
झी टॉकीज वाहिनी नेहमीच नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देत असते. महाराष्ट्राचा फेवरेट कोण या स्पर्धेच्या औचित्याने गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमातील विविध १२ विभागांमधून प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेल्या कलाकारांना झी टॉकीज सन्मानित करणार आहे. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखने फेव्हरेट स्टाईल आयकॉनचा किताब पटकावला आहे.


मराठी सिनेमाला एक स्टाईल देणाऱ्या रितेशने बॉलिवूडमधील स्टारडम असूनही मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी केलेल्या कामासाठी त्याला हा पुरस्कार दिला जातोय. रितेश हा केवळ पुरस्कार घेण्यासाठी आला नाही तर त्याने महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याबरोबर एक सुंदर डान्स सुद्धा केला. त्याच बरोबर सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ त्यांच्याबरोबर भरपूर मस्ती सुद्धा केली . 


रितेशचा वेड हा सिनेमा प्रेक्षकांना वेड लावण्यात यशस्वी ठरला. आज अख्खा महाराष्ट्र 'मला वेड लावलंय' म्हणताना दिसतोय. निर्मिती, दिग्दर्शन, प्रमोशन या टप्प्यावर रितेशने मराठी सिनेमाला एका उंचीवर नेलं आहे. त्यामुळे झी टॉकीज ने रितेश देशमुख ला हा पुरस्कार दिला आहे.