मुंबई : सेलिब्रिटी ज्याप्रमाणे त्यांच्या सिनेविश्वातील गोष्टींमुळे चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा तितकेच चर्चेत असते. कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात बऱ्याचदा चाहते उत्सुक दिसतात. पण आता एक अशी धक्कादायक गोष्ट समरो आली आहे. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.  एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचं खरं रुप समोर आलं आहे. आणि त्यामुळे याचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटी कपलमधील समोर बाब  धक्कादायक असून त्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.स्मॉल स्क्रिनवरील सर्वात चर्चेत असणारा रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या 15 च्या सीजनमध्ये या अभिनेत्रीने नुकतीच एन्ट्री घेतली आहे. त्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. 


या सीजनमध्ये अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती रितेश सहभागी झाले. नॅशनल टेलिव्हिजनवर राखीचा पती असल्याचं त्याने सांगितलं आहे. पण राखीचे पती असल्याचं सांगणाऱ्या रितेशची आता पोलखोल झाली आहे. त्याच्या पहिल्या पत्नीनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे एका वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. 



काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अनेकांची एंट्री झाली. त्यात राखीनं आपण आपल्या पतीसोबत सहभागी होत असल्याचे सांगितले होते. यावर अभिजित बिचुकलेनं राखीच्या पतीला काही भाड्यानं आणलेला पती असे शब्द वापरले होते. मात्र त्यावरुन राखीनं (Rakhi Sawant) बिग बॉस डोक्यावर घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.



 रितेशच्या पहिल्या पत्नीनं त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. तो पट्टयानं मारहाण करत असल्याचे पतीने सांगितले आहे. सोशल मीडियावर रितेशच्या पत्नी आणि मुलांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. यावर रितेशची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. त्याने म्हटलं की, मी हे पैशांसाठी केल्याचं त्याने सांगितलं आहे. त्यामुळे अशाप्रकारे पैसे कमवावा म्हणून आपण हे पाऊल टाकल्याचे त्यानं सांगितलं.