मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण कुंद्रा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकताच करणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून तो सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये करण उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात विकी कौशलच्या भाचीची भूमिका साकारणारी रिवा अरोरासोबत रोमान्स करत आहे. रिवा ही 12 वर्षांची असल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या वयात आणि तिच्या दिसण्यात असणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनवरही प्रश्न उभे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोक रिवाचं वय आणि तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. रिवानं वयाने मोठे दिसण्यासाठी काही इंजेक्शन्स घेतली आहेत का? असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. रिवा अवघ्या 12 वर्षांची आहे, पण तिचं हे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळे हैराण झाले आहेत. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या आई- वडिलांना ट्रोल केलं आहे. 





एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की 'रिवा अरोरा या बाल अभिनेत्री आणि इन्स्टाग्राम इनफ्लुएन्सर/ युट्यूबरचे तिच्या आईकडून कसे शोषण केले जाते हे पाहा. तिची आई तिला उत्तेजक वेशभूषा करण्यास आणि 40 वर्षांच्या पुरुषांसोबत अभिनय करण्यास आणि डान्स करण्यास परवानगी देते!!' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ती फक्त 12 वर्षांची आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, रिवाला तुम्ही श्रीदेवीच्या मॉम आणि उरी चित्रपटात पाहिलं असेल.' 



आणखी एक नेटकरी तिच्या आईला ट्रोल करत म्हणाला, 'ती नेहमी तिच्या YouTube वर ही क्लिकबेट थंबनेल्स ठेवते ज्यात नेहमी माझं वय किती? खरंतर असं आहे की व्हिडिओमध्ये ती कधीही तिच्या वयाबद्दल उघड करत नाही  किंवा बोलत नाही. तिची आई तिला तिचं वय लपवायला लावत आहे जे खूप विचित्र आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे बॉलिवूड गॉसिप रेडिट पेजवर पोस्ट करण्यात आले आहे. #rivaarora आईनं तिच्या मुलीला स्टेरॉईड इंजेक्शन आणि ब्रेस्ट वाढवायला लावले!!! ती 12 वर्षांची आहे!', अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या आईवर निशाणा साधला आहे.