मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रिया सेन तिच्या सुंदर अभिनयाने तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत, चाहते नेहमीच रिया सेनवर प्रेमाचा वर्षाव करतात. अलीकडेच रियाने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचे फोटो नेहमी पोस्ट करुन तिच्या चाहत्यांना घायाळ करते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया सेनने अनेक चित्रपटात काम चित्रपटांमध्ये संधी मिळाल्यानंतर रियाने कधी मागे वळून पाहिलंच नाही, एक ना अनेक चित्रपटांमधून रियाने अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण आता ती फिल्मी दुनियेपासून दुर आहे. जरी रिया सेन चित्रपट जगतापासून दूर असली तरी ती अनेकदा चर्चेत असते. कधी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या व्हिडिओंमुळे. 


बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने काही वर्षांपूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीला अलविदा केलं होतं. अभिनेत्रीचा जन्म 24 जानेवारी 1981 रोजी कोलकाता, पश्चिम बंगालमध्ये झाला. अभिनेत्री 42 वर्षांची झाली आहे आणि आज म्हणजेच 24 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती शेवटची 2017 मध्ये 'लोनली गर्ल' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. 


रिया सेन चित्रपटसृष्टीत नाव कमावू शकली नाही
रिया सेनने वयाच्या पाचव्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली होती. 1991 मध्ये 'विष्कन्या' चित्रपटातही त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने तिची आई मुनमुनसोबत मुलीची भूमिका साकारली होती. रियाने 'स्टाइल', 'झंकार बीट्स', मल्याळम हॉरर फिल्म 'अनंतभद्रम', 'नौका डूबी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


मात्र, या चित्रपटांमधून रियाला इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळवता आली नाही. हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली, इंग्रजी, तामिळ आणि तेलगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रिया सेनला बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन असंही म्हटलं जातं.  


तिच्या अभिनय कारकिर्दीत रिया सेनच्या बॉलिवूड अभिनेता अश्मित पटेलसोबतच्या अफेअरचे किस्से खूप ऐकायला मिळाले. दोघांचा एमएमएसही लीक झाला होता. या घटनेनंतर रिया सेनचं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. याशिवाय ''रागिनी MMS रिटर्न'च्या सेटवर तिच्या सहकलाकारावर अभिनेत्रीवर विवस्त्र केल्याचा आरोप केला होता.


खरं तर, रियाचा को-स्टार निशांत मलकानी यांनी हा आरोप केला होता की, जेव्हा दोन्ही कलाकार इंटिमेट सीन शूट करत होते, तेव्हा अभिनेत्रीने कॅमेरासमोर परवानगी न घेता त्याची पॅन्ट काढली होती. याशिवाय 2016 मध्ये एका पार्टीदरम्यान रिया सेनही एका मुलीला किस केल्यामुळे ती चर्चेत आली होती.