मुंबई : अत्यंत क्लेशदायक गेलेल्या '२०२०' या वर्षानंतर पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सोशल मीडियावर सहजतेने वावरताना दिसली. काही दिवसांपूर्वी रिया भाऊ शौविकसोबत (Showik Chakraborty)  मुंबईत घर शोधताना स्पॉट झाली होती. त्यावरून रिया आता नॉर्मल आयुष्य जगायला लागल्याचा अंदाज आला होता. पण हा अंदाज आता खरा ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोडिज फेम राजीव लक्ष्मणनने (Roadies fame Rajiv Lakshman) रिया चक्रवर्तीचा सुंदर फोटो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी रिया राजीवसोबत एका फॅमिली गेट टू गेदरमध्ये भेटली. यावेळी रियाने राजीवला हग करत फोटो काढला. हाच फोटो राजीवने 'My Girl' म्हणतं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रिया अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच अगदी थोडा मेकअप करून केस मोकळे ठेवत तिने हा सेल्फी क्लिक केला आहे. महत्वाची बाब म्हणजे राजीवने ही पोस्ट शेअर केल्यानंतर कमेंट्स पोस्ट टर्न ऑफ केली आहे. 



अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी राहत्या घरी वांद्रे येथे आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांच्यावर आरोप करण्यात आले. या आरोपावरून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.


नव्या वर्षात रिया मागील वर्ष हे एक वाईट स्वप्न होतं असं म्हणत विसरून नव्या आयुष्याला सुरूवात करत असल्याचं रियाच्या मैत्रिणीने म्हटलं आहे. रियाची मैत्रिण रुमी जाफरीने रियाला सपोर्ट करत म्हटलं आहे की,'रिया लवकरच या सगळ्यातून बाहेर पडेल. तिला मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करेल.'