Mahesh Babu : असं म्हटलं जातं, की संकटं येतात आणि त्यांची साखळीट सुरु होते. अभिनेता, सुपरस्टार महेश बाबू (South indian Actor Mahesh babu) याच्याबाबतीतही सध्या असंच काहीसं घडताना दिसत आहे. 28 सप्टेंबरलाच महेश बाबूच्या आईचं निधन झालं. दीर्घ काळापासून आजारी असणाऱ्या इंदिरा देवी यांच्या जाण्यानं महेश बाबूनं मायेचं माणूस कायमचं गमावलं. एकिकडे तो या दु:खातून सावरत नाही, तोच आणखी एका संकटाने त्याची वाट धरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता काय झालं? 
महेश बाबूच्या आईनं (Mahesh babu mother) जगाचा निरोप घेण्याच्या एक दिवस आधी एक चोर त्याच्या घरी रात्रीच्या वेळी घुसला होता. 30 फूट उंच भींत ओलांडून तो घरात शिरला होता. घरात घुसून संधी साधत चोरी करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण, वेळीच हे लक्षात आल्यामुळं त्याचे मनसुबे अपयशी ठरले. (Robbery Attempt at South indian Actor At Mahesh Babus House)


पाहा : आजीच्या दुखद निधनाने आई नम्रता शिरोडकरला बिलगून मुलगी ढसाढसा रडली, महेश बाबूने असं सावरलं... Video


 


अभिनेत्याच्या घरी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकानं लगेचच सदर घटनेची माहिती ज्युबली हिल्स पोलीसांना दिली. ज्यानंतर पोलिसांनी त्या चोराला ताब्यात घेतलं. यामध्ये चोराला दुखापत झाल्यामुळं त्याला उपचारांसाठी रुग्णालयातही पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा महेश बाबू मात्र घरात नव्हता. सध्याच्या घडीला या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 


आईच्या निधनामुळं कोलमडला सुपरस्टार... 
तिथं इंदिरा देवी (Mahesh Babu mother death) यांच्या निधनामुळं महेश बाबूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यातच चोरीच्या तपासाचं हे प्रकरण. एकिकडे भावनिकरित्या कोलमडलेला असताना आता महेश बाबूला त्याचे कलाकार मित्र धीर देताना दिसत आहेत.