Hansika Motawani News: कलाकारांना आपल्या चित्रपटातील एका सीनसाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. खासकरून रोमॅण्टिक सीन किंवा इन्टिमेट सीनसाठीही त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी. हे सीन रूपेरी पडद्यावर साकार करण्यासाठी इन्टिमेट सीन डिरेक्टरही असतात. अभिनेत्री हंसिका मोटवानी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसते. परंतु सध्या तिच्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चा रंगली आहे. नुकत्याच तिच्या 'पार्टनर' या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. परंतु या लॉन्चच्या वेळी मात्र अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या सहकलाकारानं एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा सहकलाकार अभिनेता रोबो शंकर यानं हे वक्तव्य केलं आहे. चित्रपटात तिला स्पर्श करण्यावरून त्यानं हे वक्तव्य केलंय. यावेळी तो नक्की काय म्हणाला हे जाणून घेऊया आणि नक्की त्याच्या या वक्तव्यानं काय रणांगण उठलंय याबद्दलही जाणून घेऊया. एका सीनमध्ये त्याला हंसिकाला स्पर्श करायचा होता. तिच्या पायांना त्याला स्पर्श करायचा होता. परंतु हे त्याला हंसिका मात्र करून दिलं नाही. एवढंच नाही तर तिच्या पायाच्या अंगठ्यालाही स्पर्श करू दिलं नाही. पण जेव्हा चित्रपटाच्या हिरोनं तिला स्पर्श केला तेव्हा मात्र हंसिकानं कसलाच आक्षेप घेतला नाही. त्यात त्याला हिरो असण्याचा फायदा असतो, असं तो यावेळी म्हणाला. 


परंतु हे वक्तव्य केल्यावर मात्र रोबो म्हणाला की तो यावेळी मस्करी करतो आहे आणि त्याच्या या वक्तव्याला जास्त गांभीर्यानं घेऊ नये. परंतु तो जरी असं म्हणाला तरीसुद्धा त्यांचे हे बोलणे नेटकऱ्यांना काहीकेल्या पसंत पडलेले नाही. त्याला त्याच्या या वक्तव्यावरून खूप टीका सहन करावी लागत असून त्याला अनेकांनी ट्रोलही केलं आहे. ट्रोलर्सनी मात्र यावेळी त्यांना चांगलंच सुनावलं आहे. एका युझरनं म्हणलंय की, ज्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसं बोलावं हे काहीच कळतं नाही हे दुर्देव तेव्हा अशी माणसं ही अभिनयासाठीही अजिबात योग्य नाहीत तर काहींना म्हटलंय की अशा विचारांच्या लोकांना त्यांच्या या वाईट वृत्तीमुळे खतपाणी मिळते.


हेही वाचा - 'लिटिल चॅम्प्स'च्या वेळी मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना काय नावाने हाक मारायचे? स्वत:च केला खुलासा


परंतु त्यानं जरी असं म्हटलं असलं की मी हे गमतीत म्हणतो आहे परंतु त्यानं हंसिकाची जाहीर माफी मागितली नाही तर नंतर या चित्रपटाचा हिरो अभिनेता जॉन विजय आणि चित्रपटाच्या संपुर्ण टीमनं हंसिकाची जाहीर माफी मागितली. हंसिका मोटवानी हिनं बालकलाकार म्हणून चित्रपटातून कामं करायला सुरूवात केली. 4 डिसेंबर 2022 साली तिचं लग्न झाले होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे रोबो शंकर?  


रोबो शंकर हा एक लोकप्रिय दाक्षिणात्तय अभिनेता आहे. त्याला 'कलक्का पोवतू यारू' या रिएलिटी शोमधून प्रसिद्धी मिळाली. त्यानं त्यानंतर 'मारी' या लोकप्रिय चित्रपटात काम केले. 'वेलैनु वंधुता वेल्लकारण' या चित्रपटातूनही काम केलं आहे. काही महिने तो कावीळमुळे आजारी होता त्यामुळे त्यानं अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता त्यानं पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. तो आपल्या विनोदासाठीही ओळखला गेला.