Dharmendra and Shabana Azmi liplock : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट काल 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात खूप मोठी स्टार कास्ट आहे. त्यामुळे अनेकांना यात काय वेगळं पाहायला मिळणार हिच अपेक्षा होती. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी तर आगाऊ बूकिंग देखील केली होती. या चित्रपटातून लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. याशिवाय जे आजपर्यंत कधी झालं नाही ते आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळालं आहे आणि ते म्हणजे अभिनेता धर्मेंद्र आणि शबाना आजमी या दोघांमध्ये एक इंटीमेट सीन दाखवण्यात आला आहे. त्यावरून अनेक लोक हे त्यांचं वय लक्षात घेता या फोटोंवर मजेदार कमेंट कमेंट करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपट पाहताना आणखी एक आश्चर्य झालं आहे. ते म्हणजे 87 वर्षांचे धर्मेंद्र चित्रपटात रणवीरच्या आजोबाच्या भूमिकेत दिसले आहेत. तर जया बच्चन या त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत. पण एकाच घरात ते दोघं अनोळखी लोकांसारखे राहतात. कारण लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही धर्मेंद्र हे शबाना आझमी यांच्या प्रेमात असतात. हे पाहता रणवीर आणि आलिया हे धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. ज्यानंतर चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना यांचा एक लिपलॉक दाखवण्यात आला आहे. जे पाहून अनेकांना आश्चर्य झाले आहे. नेटकऱ्यांनी तर यावर सोशल मीडियावर त्यांची मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. 






एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की, धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातलं लिपलॉक याची कोणीही अपेक्षा केली नव्हती.  दुसरा नेटकरी म्हणाला, रणवीर आलियाला भेटतो कारण त्याला त्याचे आजोबा धर्मेंद्र यांना त्यांची एक्स गर्लफ्रेंड शबाना आझमी यांच्याशी भेटवायचे असते. बऱ्याच काळापासून पॅरेलाईझ्ड असलेले धर्मेंद्र शबाना आझमी यांना पाहताच त्यांच्या पायावर उभे राहतात आणि त्यानंतर ते किस करतात. त्यांच्यातला हा किसिंग सीन अनपेक्षित होता. तिसरा नेटकरी म्हणाला, रणवीर आणि आलियापेक्षा धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यात असलेली केमिस्ट्री ही पाहण्यासारखी आहे. 



धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या रोमांसवर शबाना आझमी एका मुलाखतीत म्हणाल्या, माझ्या आणि धर्मेंद्र यांच्या भूमिकेत असलेला रोमांस आहे हिंदी चित्रपटसृष्टीतील छोट्या छोट्या गोष्टींवर आधारीत आहे. त्यामुळे मी त्यावर जास्त बोलणार नाही. 


हेही वाचा : RARKPK Twitter Review : '25 वर्षात तो दिग्दर्शन शिकला नाही...', करण जोहरच्या चित्रपटाला नेटकऱ्यांच्या संमीश्र प्रतिक्रिया


दरम्यान, हा चित्रपट 2 तास 48 मिनिटांचा असून अनेक नेटकऱ्यांना त्याचा पहिला भाग आवडला तर दुसरा अनेकांना आवडला नाही. काही नेटकऱ्यांनी हा संपूर्ण चित्रपट अप्रतिम असल्याचे म्हटले होते. चित्रपटाच्या कमाईविषयी बोलायचे झाले तर ‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर यात थोडा बदल असू शकतो. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण 160 कोटींच्या बजेटचा असल्यानं चित्रपटानं अपेक्षे पेक्षा कमी कमाई केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुढे दोन दिवस वीकेंड आहे, त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत हा चित्रपट जबरदस्त कलेक्शन करेल, असा अंदाज वर्तवन्यात येत आहे.