Rohit Raut and Juilee Joglekar : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधील रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी सगळेच ओळखतात. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर झालं. तर 2022 मध्ये ते दोघं लग्न बंधनात अडकले. लग्नाआधी काही काळ ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. तर लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय आणि त्यासाठी आई-वडिलांची कशी समजूत काढली आणि त्यासाठी किती खटाटोप केला याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित आणि जुईलीनं ही मुलाखत 'लोकमत फिल्मी'ला दिली आहे. यावेळी लिव्ह इनबाबत बोलताना रोहितनं सांगितलं की "प्रेम, खूप प्रेम आणि आई-वडिलांचं प्रेम असे तीन प्रकारचे प्रेम असतात. आम्ही सुरुवातीच्या काळात आई-वडिलांचं प्रेम याचा थोडासा फायदा उचलला. आम्ही एकमेकांना विचारलं की आपण लग्न करुया का? त्यानंतर आम्ही दोघांच्याही घरी सांगितलं. घरी आम्ही सांगितलं की आम्ही लग्न करतोय...पण, आपण लग्न करणार आहोत का? हा प्रश्न आम्हाला 6 महिन्यांनी पडला. कारण, आम्ही खूप लांब राहायचो. मी कल्याण आणि जुई जेव्हिएलआर... त्यामुळे आम्हाला भेटायलाही खूप प्रवास करावा लागायचा. काही दिवसांनी आम्हाला कळलं की हे वर्कआऊट होणार नाही. त्यामुळे एकमेकांना जाणून घेण्यासाठी आपल्याला एकमेकांसोबत रहावं लागणार. कारण, माझं प्रेम कुठल्याही व्यक्तीवर असू शकतं. पण, कुठल्याही व्यक्तीबरोबर मी राहू शकत नाही. हे माझ्याचसाठी नाही तर तिच्यासाठीही अगदी तेच आहे." 



हेही वाचा : नागा चैतन्यनं घेतली नवी-कोरी Porsche, लोक म्हणाले 'पुण्याला येऊ नकोस!'


आई-वडिलांना असं सांगितलं लिव्ह-इनविषयी!


पुढे आई-वडिलांना लिव्ह-इनविषयी कसं सांगितलं हे सांगत रोहित म्हणाला, "सुरुवातीला आम्ही आई-वडिलांच्या विश्वासाचा थोडा फायदा उचलला. मी सांगितलं की कल्याणवरुन ज्युईलीला जेव्हिएलआर भेटायला येण्यासाठी ओला टॅक्सीला खूप पैसे जातात. ही जेव्हिएलआरला असते एकटीला राहण्यासाठी एवढं मोठं घर, भाडं खूप लागतं. मग मधली सोय काढूया असं सांगतं त्यांनी आई-वडिलांना सांगितलं की हवं तर आम्ही 2BHK घेतो. एक तिचा बेडरूम, माझा एक बेडरूम आणि हॉल तर आहेच. तुम्हीही कधीही येऊ शकता, असं आम्ही त्यांना सांगितलं. आमच्या दोघांचेही बाबा खूप कडक शिस्तीचे असल्यामुळे तिच्या आईनं त्यांची समजूत घातली. तिची आई इथे आली आणि आमच्याबरोबर राहतेय असा कॉन्ट्रॅक्ट तिनं साइन केला. आमचं लिव्ह इन रिलेशनशिपसुद्धा आई-वडिलांनी मॉनिटर केलेलं होतं. लिव्ह इनमध्ये रहायला सुरुवात केल्यानंतर लॉकडाऊन लागलं. त्यामुळे आम्हाला बाहेरच पडता आलं नाही. त्यामुळे आम्हाल ती वर्षे एकमेकांना जाणून घ्यायला मिळालं कारण लॉकडाऊन ही हद्द आहे कोणत्याही व्यक्तीला सहन करायची किंवा जाणून घ्यायची. लिव्ह इन रिलेशनशिप हा आमच्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता आणि तो मजेसाठी घेतलेला नव्हता. लिव्ह-इन रिलेशनशिप ही सीरियस गोष्ट आहे."