Rohit Roy Followed Dangerous Diet : सेलिब्रिटी कायम लाईमलाइटमध्ये राहण्यासाठी फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतात. त्यांच्या बॉडीमध्ये होणारे बदल हे त्यांच्या करिअरसाठी फार महत्त्वाचे असतात. कधी त्यांनी बॉडी बनवावी लागते तर कधी वजन कमी किंवा जास्त करावं लागतं. यासाठी अनेकदा सेलिब्रिटी अशा टाईपचं डायट फॉलो करतात ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागतो. असंच काहीसं अभिनेता रोहित रॉयसोबत देखील झालं आहे. रोहित रॉयनं सांगितलं की त्यानं 25 दिवसात 16 किलो वजन कमी केलं होतं. त्यासाठी त्यानं सगळ्यात घाणेरडं डायट फॉलो केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित रॉयनं 'शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यानं 25 दिवसात 16 वजन कमी केलं होतं. असं केल्यानं रोहित रॉयनं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. खरंतर, आता रोहितनं त्या डायटला मुर्खपणा म्हटलं आहे आणि त्याशिवाय हे देखील सांगितलं की तो यापुढे असं कधीच करणार नाही. 


रोहितनं त्याच्या या डायट विषयी साइरस ब्रोचाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की मी खूपच घाणेरडं डायट फॉलो केलं होतं. मी शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला या चित्रपटासाठी वजन कमी केलं होतं. मला खूप बारिक दिसायचं होतं. त्यामुळे मी लिक्विड डायटवर होतो. हे डायट करुन मी 25-26 दिवसात 16 किलो वजन कमी केलं होतं. 


या डायटविषयी पुढे सांगत रोहित म्हणाला, हे डायट खूप वाईट होतं. या डायटनं अवयव खराब होऊ शकतात. त्यामुळे त्याला घाणेरडं डायट म्हणतोय. मी आयुष्यात कधीच अशा प्रकारचं डायट पुन्हा फॉलो करणार नाही. काहीही झालं तरी नाही. या डायटविषयी मी अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींकडून ऐकलंय की ते हे डायट फॉलो करतात. तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य होईल की काही लोक तर या डायटमुळे अनेक लोक मेले. 


दरम्यान, रोहितनं लोकांना सोशल मीडिया अकाऊंटवरून फिटनेस इंस्पिरेशन घेण्यास नकार दिला आहे. रोहितनं सांगितलं की 'या डायटमधून निघनं खूप मोठं स्ट्रगल आहे. हे तुमच्या मेंदूत सुरु राहतं कारण हे डायट फॉलो करत असताना तुम्ही एका विशिष्ठ प्रकारे दिसतात आणि कायम तुम्हाला तसं दिसायचं असतं. पण कोणीही त्या लूकमध्ये कायम राहू शकत नाही. मी कायम बोलतो की, माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाऊ नका. मी तिथे तेच फोटो अपलोड करतो जे बेस्ट असतात.'