मुंबई : बॉलिवूडचा अ‍ॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टी 48 वर्षेांचा आहे. रोहित शेट्टी बॉलीवूडचा एक तगडा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. लवकरच त्याचा आगामी सिनेमा 'सूर्यवंशी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे तीन सुपरस्टार अक्षय कुमार, अजय देवगन आणि रणवीर सिंह दिसणार आहेत. रोहित शेट्टीच्या चाहत्यांना आशा आहे की, त्याचा हा चित्रपटही सुपरहिट असेल. याआधी त्याने 'सिंघम', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'गोलमाल' सारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शेट्टीचा जन्म 14 मार्च 1973ला मुंबईमध्ये झाला. रोहित शेट्टीचे वडील एम.बी. शेट्टी एक चित्रपट अॅक्शन कोरियोग्राफर होते, तसंच ते स्टंटमॅन आणि अॅक्टर देखील होते. त्याचवेळी त्याची आई मधु यांनी चित्रपटात ज्युनियर आर्टिस्ट म्हणून देखील काम केलं होतं.


रोहित शेट्टीला उदय शेट्टी आणि हृदय शेट्टी असे दोन भाऊ आहेत. याशिवाय त्याला 4 बहिणी आहेत. रोहितने मुंबईतील सेंट मेरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच रोहित शेट्टीला अभ्यासापेक्षा चित्रपटांमध्ये जास्त रस होता.


रोहित शेट्टी 14 वर्षांचा असताना त्यांनी दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 17व्या वर्षी रोहितने दिग्दर्शक कुकू कोहलीसोबत अजय देवगणच्या 'फूल और कांटे' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. यानंतर त्याने 13 वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.


 'गोलमाल' सारख्या सुपरहिट चित्रपट देणारा रोहित शेट्टी तब्बू आणि काजोलसारख्या अभिनेत्रींचा स्पॉटबॉय म्हणून काम करायचा. १९९५साली आलेल्या 'हकीकत' या चित्रपटात दिग्दर्शक रोहित शेट्टीने तब्बूच्या साड्यांना ईस्त्री दोखील केली आहे.


रोहित शेट्टी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत किती पगार घ्यायचा हे फारच कमी लोकांना माहिती असेल. दिवसा काम करण्यासाठी रोहितला फक्त 35 रुपये पगार मिळायचा. पण परिश्रम घेऊन त्याने एक विशेष स्थान बॉलिवूडमध्ये मिळवलं आहे.


रोहित शेट्टी आपल्या दमदार अॅक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो. तो लवकरच अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' हा सिनेमा घेऊन येणार आहे.