मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीत रोहित शेट्टीचा समावेश होतो. त्याचे अॅक्शन आणि मसाला चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. रोहित शेट्टी आज मोठ्या स्टार्ससोबत काम करत आहे. पण आज तो ज्या स्थानावर पोहोचला आहे त्यासाठी त्याने खूप मेहनत केली आहे. आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देत रोहित शेट्टीने सांगितलं की, जेव्हा त्याने काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याला 35 रुपये पगार मिळायचा. चित्रपटाच्या सेटवर जाण्यासाठी पैसे नसतील तर तो पायी चालत जायचा, त्यासाठी दीड ते दोन तास लागायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खायलाही पैसे नव्हते
एका मुलाखतीदरम्यान रोहित शेट्टीने सांगितलं की, त्याचा प्रवास सोपा नव्हता. तो म्हणाला, 'लोकांना वाटतं की मी चित्रपटसृष्टीतून आलो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे सोपं असेल, पण तसं नाही. बर्‍याच वेळा असं व्हायचं की मला जेवण आणि प्रवास यापैकी एक निवडावा लागायचा, कारण माझ्या खिशात फक्त एकाच गोष्टीसाठी पैसे असायचे.


रोहित रोज पायीच सेटवर पोहोचायचा.
रोहित म्हणाला, 'आम्ही सांताक्रूझमध्ये राहायचो. यानंतर आम्ही दहिसर येथील माझ्या आजीच्या घरी शिफ्ट झालो. आमच्याकडे राहायला घरही नव्हतं. मी आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीत होतो. दहिसरला माझी आजी राहत होती. मी कामासाठी मालाड ते अंधेरीला चालत जायचो. मला दीड ते दोन तास लागलायचे. मला अनेक शॉर्टकटही माहित आहेत. जेव्हा मी माझ्या ड्रायव्हरला हा मार्ग फॉलो करायला सांगतो तेव्हा तो मिररमधून माझ्याकडे पाहतो आणि विचार करतो की मला सगळे रोड कसे माहित आहेत? 


या सिनेमातून उजळलं नशिब
रोहित शेट्टीने 2003 मध्ये अजय देवगणला घेवून  'जमीन' हा सिनेमा बनवला, जो बॉक्स ऑफिसवर संमित्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2006 मध्ये 'गोलमाल' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं. हा  चित्रपट हिट ठरला. यानंतर रोहित शेट्टीने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केले.