मुंबई : आपल्या सिनेमातील जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीने प्रेक्षकांचे मन जिंकणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीने आपल्या दिग्दर्शकबद्दल मोठा खुलासा केला आहे. रोहितला सिनेसृष्टीत त्यांचे सिनेमे त्याच्या जीवापेक्षा मोठे वाटतात. त्याचे सिनेमे हे बिग बजेट असतात. रोहितने त्याविषयीही सांगितले. 


म्हणून बनवत नाही कमी बजेटचे सिनेमे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शेट्टीचे सिनेमे बिग बजेट असण्यामागचे कारण हे की त्याला कमी बजेटचे सिनेमे बनवायला भिती वाटते. कमी बजेटचे सिनेमे बनवणार का? असे विचारले असता तो म्हणाला की मला भिती वाटते कमी बजेटचे सिनेमे बनवायला. रोहित पुढे म्हणाला की, जर कमी बजेट सिनेमाची कथा चांगली असेल तर मी नक्कीच त्याची निर्मिती करेन. पण मी कमी बजेटचे सिनेमे बनवणार नाही. 
रोहित म्हणाला की, सिनेमा माझ्यासाठी माझ्या जीवनापेक्षा मोठा आहे. माझ्या सिनेमांमुळेच लोक मला ओळखतात. माझे प्रेक्षक रोहित शेट्टीचा सिनेमा म्हणून सिनेमे पाहतात. त्यामुळे मी त्यांना धोक देऊ इच्छित नाही. रोहित सध्या लेडी सिंघमच्या तयारीत असल्याचे समजतेय.


सध्या रोहित यात व्यस्त


रोहित शेट्टी सध्या सिंघमच्या अॅनिमेटेड सिरीजच्या तयारीत आहे. तर त्याची सर्व टीम लिटिल सिंघमच्या तयारीत आहे. लहान मुलांवर आधारित हा सिनेमा २१ एप्रिलला डिस्कव्हरी किड्स वर प्रसारीत होईल. या सिनेमा शेट्टी पिक्चर्स आणि रिलायन्स अॅनिमेशनच्या अंतर्गत बनवला जात आहे. त्याचबरोबर रोहित रणवीर सिंगच्या सिम्बाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. या सिनेमात अजय देवगनप्रमाणे रणवीर सिंग पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.