मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने देशभक्तीवर आधारित सिनेमांमधून आपल्या अभिनयाने अनेकांची मन जिंकली. गेल्या वर्षी सत्यमेव जयते आणि परमाणू सारख्या सिनेमांमधून जॉनने उत्तम कामगिरी केली होती. आता जॉन 'रोमिओ अकबर वॉल्टर' (रॉ) सिनेमामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारीला या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


टीझरमध्ये जॉनचे ८ वेगवेगळे लूक दिसत आहेत. त्याच्या बॅकग्राउंडला 'ए वतन' हे देशभक्तीपर गाणं चालू आहे. टीझरमधून विविध वेशात दाखवण्यात आलेल्या जॉनने भूमिकेला योग्य तो न्याय दिला असल्याचे दिसते. रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित 'रोमिओ अकबर वॉल्टर' येत्या १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.  



जॉन अब्राहम या सिनेमामध्ये आठ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये तो २६ ते ८५ वयापर्यंतच्य़ा लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो रियल लाइफ गुप्तहेरची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी जॉनने हा खुलासा केला होता की, हे त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. 'रॉ'मध्ये जॉन अब्राहम एक भारतीय गुप्तहेरच्या भूमिकेत दिसत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन तो तेथील काही गुप्त गोष्टी बाहेर आणतो. या सिनेमात जॉन सोबतच मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच सिनेमात जॅकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि सिकंदर खेर यांच्या देखील भूमिका आहेत.