मुंबई : लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता रोवन एटकिंसन यांच्याबाबत सोशल मीडियावर सध्या अशा चर्चा सुरु आहेत, ज्यामुळं चाहत्यांच्या चिंतेत भर पडत आहे. ‘मिस्टर बीन (Mr Bean)’ या भूमिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आलेला हा कलाकार खरंच हे जग सोडून गेला का, हाच प्रश्न सध्या चाहते उपस्थित करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर ‘मिस्टर बीन (Mr Bean)’ च्या निधनाच्या चर्चांना उधाण आल्यामुळं काहीसा तणावही निर्माण झाला आहे. 


पण, सूत्रांच्या माहितीनुसार एटकिंसन पूर्णपणे बरे आहेत. त्यांच्या निधनाचं वृत्त ही एक अफवा आहे, त्यामुळं कोणीही चिंता करण्याचं कारण नाही. 


Rowan Atkinson यांच्या निधनाची माहिती / अफवा आपल्यापर्यंत पोहोचताच ट्विटरवर अनेकांनीच RIP Mr Bean असा हॅशटॅग लिहित त्यांना श्रद्धांजली देण्यास सुरुवात केली. 


सर्वप्रथम एका वाहिनीनं त्यांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध केल्याचं म्हटलं गेलं. ज्यामध्ये या अभिनेत्याचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. 


प्रत्यक्षात मात्र तसं काहीही घडलं नसून चाहत्यांनी चिंता करण्याचं कारण नसल्याचं आता सांगण्यात येत आहे. 


दरम्यान, एखाद्या लोकप्रिय कलाकाराच्या निधनाची अफवा उठण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याच कलाकारांबद्दल अशाच प्रकारच्या अफवांना उधाण आलं होतं. मुळात अशा अनेक अफवा चाहत्यांना विचलित करुन जातात. सोबतच त्या कलाकारालाही यामुळं काही अडचणींना सामोरं जावं लागलं ही वस्तूस्थिती लपलेली नाही.