मुंबई : कॉमेडियन, लेखक, सिटकॉम मिस्टर बीन रोवन एटकिंसनचा आज जन्मदिन आहे. जगभरात रोवनला नावाने कमी आणि 'मिस्टर बीन' नावाने जास्त ओळखलं जातं. एटकिंसनला जरी मिस्टर बीन नावाने ओळखलं जात. असं असलं तरीही एटकिंसनचं म्हणणं आहे की,'हे पात्र अतिशय तणावपूर्व आणि थकवणारं आहे.' ६५ वर्षीय अभिनेत्याचं म्हणणं आहे की,'आता मिस्टर बिनचं कॅरेक्टर साकारायला मजा येत नाही. कारण हे पात्र साकारताना अधिक जबाबदारी असते.'त्यामुळे आजनंतर मिस्टर बिन हे पात्र अभिनेता रोवन साकारणार नाहीत. 


आज रोवन एटकिंसनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या खास गोष्टी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस्टर बिन प्रमाणेच रोवन 'ब्लॅकेडर', 'नाइन ओ क्लॉक न्यूज', 'द सिक्रेट पोलिसमॅन बॉल्स' आणि 'द थिन ब्लू लाइन नाम' या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. 


रोवन एटकिंसन यांनी या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यक्रमात काम केलेलं नाही. पण असं असलं तरीही त्यांना 'मिस्टर बीन' म्हणून ओळखलं जातं. 


रोवन यांचा जन्म आजच्या दिवशी १९५५ साली डरहममध्ये झाला. त्यांचं शिक्षण आणि संगोपन तेथेच झालं. त्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्डच्या क्वींस कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग केलं आहे. एकेकाळी त्यांना लॉरी चालवण्याचा छंद जडला होता. रोवन भरपूर आनंदी आणि मनमोकळी व्यक्ती आहे. रोवन रील लाइफमध्ये लोकांना खूप हसवतात तेवढेच रिअल लाइफमध्ये देखील अतिशय आनंदी आहे.  



रोवन एटकिंसन हे नावं ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आहे. रोवनचा स्टारडम मोठ्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक आहे. मिस्टर बीन यांच लंडनमध्ये एक आलीशान घर आहे. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. यासोबतच रोवन एटकिंसन यांच्या जवळ जगातील सर्वात महागडी मॅकलोरेन एफ १ देखील आहे. या कारची किंमत ८० ते १०० करोड रुपये खर्च आहे.