मुंबई : आज मेगन मार्कल आणि प्रिंस हॅरी  विवाहबंधनात अडकले आहेत. लंडनमध्ये रंगणार्‍या या शाही सोहळ्यामध्ये जगभरातून अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रालादेखील आमंत्रण आहे. प्रियांकाने मेगन आणि प्रिंस हॅरीला शुभेच्छा देण्यासाठी लंडनमध्ये हजेरी लावली आहे. त्यावेळेस खास राजेशाही ड्रेसकोडनुसार प्रियांका चोप्राने खास ड्रेस आणि हॅट परिधान केली होती.  


 लंडनमध्ये पार पडला विवाहसोहळा  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचा सोहळा विंडसर कॅसलच्या सेंट जॉर्ज चॅपल चर्चमध्ये पार पडला. काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मेघन आणि प्रिंस हॅरी विवाहबंधनात अडकले.  प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कलसाठी मुंबईचे डब्बेवाले पाठवणार 'हे' खास गिफ्ट


 



  प्रियंका आणि मार्कलची भेट 


काही वर्षांपूर्वी  प्रियंका आणि मार्कलची भेट पहिल्या वार्षिक एले वुमन इन टेलिव्हिजन डिनरमध्ये ओळख झाली. या दोघींची तिथुनच ओळख आणि मैत्री झाली. 


संबंंधित बातम्या 


'असा' तयार झाला रॉयल वेडिंंगचा केक !