Oscars 2023: RRR चित्रपटाने घडवला इतिहास, `नाटू नाटू` गाण्याने जिंकला ऑस्कर पुरस्कार..
Naatu Naatu Song Win Oscars 2023: आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडत आहे. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये आहेत. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या 95 व्या ऑस्कर सोहळ्यात भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.
Naatu Naatu Songs Wins Oscars 2023: 95 व्या ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळा लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे. जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या 95 व्या ऑस्कर पुरस्कारांची धमाकेदार सुरुवात झाली असून भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटाने हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे भारतीय चित्रपट RRR मधील 'नाटू-नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉंन्गचा पुरस्कार मिळाला.
‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. कालभैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांच्या आवाजातील या गीताला ऑस्कर मिळाल्याची घोषणा व्यासपीठावरून झाली आणि आरआरआरच्या चमूने एकच जल्लोष केला.
RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली आणि त्यांची पत्नी उपासना कामिनेनीसह ज्युनिअर एनटीआर आणि आणि राम चरण गोल्डन ग्लोब्समध्ये प्रतिनिधित्व केले. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी 1920 च्या ब्रिटिश राजवटीतील भारताचे स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटिश कलाकार रे स्टीव्हनसन, अॅलिसन डूडी आणि ऑलिव्हिया मॉरिस यांचा समावेश होता.
तर दुसरीकडे ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारत भारताच्या The Elephant Whisperers या माहितीपटानं ऑस्कर पटकावला आणि क्षणार्धातच या माहितीपटाला साकारणाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. 'द एलिफंट व्हिस्परर्स'ची कहाणी अतिशय असामान्य असून, यामध्ये मनुष्य आणि प्राणी यांच्यातील नातं हळुवारपणे उलगडून सांगण्यात आलं आहे. एक दाक्षिणात्य जोडपं अनाथ हत्ती (रघू)ची जबाबदारी घेतं आणि त्याला वाचवण्यासाठी जी मेहनत करतं यावर माहितीपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. कार्तिकी गोंसालवीसच्या दिग्दर्शनाका साकारलेल्या या माहितीपटाची निर्मिती सिख्या एंटरटेनमेंटनं केली आहे.