RRR Fame Ray Stevenson Death : 'आरआरआर' या चित्रपटानं ऑस्करमध्ये पुरस्कार जिंकत भारताचं नाव मोठं केलं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अभिनेता  रे स्टीवेन्सन यांचं निधन झालं आहे. रविवारी 21 मे रोडी इटली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षाचे होते. डेडलाइननं दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यांच्या प्रतिनिधींनी इंडिपेंडेंट टॅलेंटनं त्यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रे स्टीवेन्सन यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर ‘आरआरआर’ टीमकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ‘आरआरआर’च्या सोशल मीडिया पेजवरुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 'आमच्या टीमसाठी ही धक्कादायक बातमी आहे. तुमच्या आतम्याला शांती मिळो. तुम्ही नेहमीच आमच्या स्मरणात रहाल', असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून फोटो शेअर करत रे स्टीवेन्सन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 



रे स्टीव्हन्सन यांनी एसएस राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यांच्या जबरदस्त अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली होती. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे नाव गव्हर्नर स्कॉट बक्सटन असे आहे. ‘आरआरआर’ हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्यात त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाविषयी बोलायचे झाले तर 90 च्या दशकात त्यांनी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.


हेही वाचा : Raghav Chadha यांचा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, ‘बाबू भैय्या लडकी का चक्कर'


रे स्टीव्हन्सन यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी मार्वलच्या 'थोर' फ्रँचायझीमधील वोल्स्टॅग आणि 'वायकिंग्स'मधील त्यांच्या काही भूमिका होता. त्यासाठी त्यांना अनेक लोक ओळखतात. याशिवाय त्यांनी अॅनिमेटेड स्टार वॉर्स सीरिजमध्ये 'द क्लोन वॉर्स' आणि 'रिबल्स' मध्ये गार सॅक्सनसाठी डबिंग केली होती. डिस्ने प्लसच्या आगामी 'द मँडलोरियन' स्पिनऑफ 'अहसोका' मध्ये रोझारियो डावसनसोबत काम करण्यासाठी तयार होते. 



रे स्टीव्हन्सन यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर यूएसच्या एका आउटलेट डेडलाइननं दिलेल्या माहितीनुसार, रे स्टीव्हन्सन यांचा जन्म 25 मे 1964 रोजी लिस्बर्न, नार्थ आयर्लंड येथे झाला. त्यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस युरोपियन मालिका आणि टेलिफिल्म्समध्ये काम केले. 


आरआरआर या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आलिया भट्ट आणि अजय देवगण यांची या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. याच चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.