Raghav Chadha यांचा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, ‘बाबू भैय्या लडकी का चक्कर'

Raghav Chadha Ramp Walk Video : परिणीति चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत असताना आता राघव चड्ढा यांच्या रॅम्पवॉकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि पोस्टवर कमेंट करत नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: May 22, 2023, 06:36 PM IST
Raghav Chadha यांचा रॅम्पवॉकचा व्हिडीओ पाहताच नेटकरी म्हणाले, ‘बाबू भैय्या लडकी का चक्कर'  title=
(Photo Credit : Social Media)

Raghav Chadha Ramp Walk Video : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि तिचे होणारे पती खासदार राघव चड्ढा हे त्यांच्या साखरपुड्यापासून चर्चेत आहेत. ते दोघं सतत सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताना दिसतात. आता राघव चड्ढा यांचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याच्या कोणत्या पॉलिटिकल कार्यक्रमातील नाही तर फॅशन इंडस्ट्रीतील आहे. राघव चड्ढा यांचा हा व्हिडीओ रॅप्म वॉक करतानाचा आहे. आता त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

राघव चड्ढा यांचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत राघव यांनी काळ्या रंगाचे स्टायलिस्ट कपडे परिधान केले आहेत. तर ते रॅम्पवॉकवर चालताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक झाले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘जिजाजी हिरो बनू शकतात.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जेव्हा मी हा व्हिडीओ पाहिला तेव्हा मला वाटलं, हा राघव जुयाल आहे, पण आता मला आश्चर्य झालं आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘जिजाजींची बॉलीवूडमध्ये एन्ट्री.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘बाबू भैय्या लडकी का चक्कर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'यांचं पॉलिटीकल करिअर धोतक्यात आहे आता.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'राजकारणी ते थेट अभिनेता होण्याचा प्रयत्न.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'राधे भैय्या फसगएं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आता लोक म्हणतील परिणीतिला भाजपानं पाठवलं आहे राघवचं पॉलिटीकल करिअर संपवण्यासाठी.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'लोक बॉलिवूडमधून राजकारणात जातात पॉलिटीकल करिअर करण्यासाठी आणि हे राजकारणातून बॉलिवूडमध्ये येत आहेत.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Abhidnya Bhave प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटनं एकच चर्चा

दरम्यान, परिणीति आणि राघव चड्ढा यांच्या विषयी बोलायचे झाले तर ते दोघं एकमेकांना कॉलेजच्या काळापासून ओळखतात. त्यांना जेव्हा सुरुवातीला एकत्र पाहिले होते तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्यांनी त्यावेळी नकार दिला होता. आता त्यांच्या साखरपुड्यानंतर त्यांनी त्यांचे नातं ऑफिशिअली सांगितलं आहे. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर परिणीति आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्री आणि परिणीतिची बहीण प्रियांका चोप्राही लंडनहून दिल्लीत आली होती. त्यांच्या साखरपुड्यात अनेक कलाकारांपासून राजकारणींनी हजेरी लावली होती. त्यांचे फोटो ते दोघे शेअर करत एकमेकांवर असलेले प्रेम जगासमोर सांगत आहेत.