COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Rubina Dilaik Injured: टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक (Rubina Dilaik) गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असते. खतरो के खिलाडीमध्ये (Khatron KE Khiladi) सहभाग घेतल्यानंतर ती आता झलक दिखला जा 10 मधून (jhalak dikhhla jaa) ती आपल्याला दिसते आहे. या शोमध्ये सध्या ती सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. रुबिनाचं नशीब काही चांगलं दिसतं नाही असं वाटतं, कारण तिच्यासोबत काय अपघाताच्या घटना घडतं असतात. खतरो के खिलाडी शोचं टाक्स करताना तिचा अपघात झाला होता. त्यानंतर डान्सची रिहर्सल करताना ती आपटली होती. 


आता सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral on Social media) होतो. नृत्यदिग्दर्शकसोबत डान्स करताना असं काही घडलं की तिला ही रिहर्सल करणं महागात पडलं. या व्हिडीओमध्ये ती नृत्यदिग्दर्शक सनम जोहरसोबत (Dance director Sanam Johar) परफॉर्म असताना तिच्यासोबत खतरनाक अपघात झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सनम ओव्हर हेड जंप करताना रुबीनाच्या मानेवर पडला आणि परिणामी रुबिनाच्या मानेला दुखापत झाली. (Rubina Dilaik Injured Video Viral on Social media nmp )



सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डॉक्टरांनी रुबिना दिलीकला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे  झलक दिखला जाच्या पुढच्या भागात रुबिना डान्स करताना दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.