Rubina Dilaik चा अपघात; अभिनेत्रीच्या पायाला दुखापत
रुबिना दिलेकने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला दुखापत झाल्याचं दिसत आहे
मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही एक दमदार पर्सनॅलिटी आहे. तिने टीव्ही इंडस्ट्रीवर आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आपल्या रिअल पर्सनॅलिटीने तिने लोकांना इंप्रेस केलं. तिला बॉस लेडी या नावाने ओळखलं जातं. एवढचं नव्हेतर तिच्या डान्स मुव्हने तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. एवढंच नव्हेतर तिने स्टंटमध्येही स्वत:ला सिद्ध केलं.
रुबीना दिलैक सध्या सेलिब्रिटी डान्स रिएलिटी शो 'झलक दिखला जा 10' (Jhalak Dikhhla Jaa 10) मध्ये देखील दिसली आहे. रुबीना आपल्या डान्स मुव्ह्सने बाकी कंटेस्ट्सला जबरदस्त टक्कर देत आहे. रुबीना दिलैकने शोमध्ये अतिशय बोल्ड परफॉर्मन्स सादर केला. ज्यामध्ये तिने 500 खिळ्यांवर 31 किलो वजनाचा लेहेंगा घालून डोक्यावर आगीची घागर घेऊन डान्स केला. त्याचा डान्स पाहून जजपासून प्रेक्षकही हैराण झाले. यामुळे अभिनेत्रीलाही दुखापत झाली आहे.
रुबिना दिलैक जखमी
रुबिना दिलेकने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री दुखापतीमुळे ओरडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पाहून शकतो की, लोकं तिच्या पायाची दुखापत ठिक करत आहेत मात्र रुबिना दिलैक वेदनांमुळे रडत आहे. यावेळी ती टी-शर्ट आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. याचबरोबर ती सफरचंदही खाताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''नवीन फॉर्म, नवी दुखापत. आता पुढे काय?"
कोरिओग्राफरने केली कमेंट
व्हिडिओवर कोरिओग्राफर प्रतीक कुटेकरने कमेंट केली आहे की, ''माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. ही या घागऱ्याची कमाल आहे. सनम जोहर हाच तोच दिवस आहे तू गेला होतास." सनम जोहर याआधी रुबिना दिलाकचा कोरिओग्राफर पार्टनर होता, पण अलीकडेच कोरिओग्राफरची अदलाबदल झाली आणि रुबीनाला प्रतिक मिळाला. रुबिनाच्या लेटेस्ट डान्स परफॉर्मन्समध्ये ती प्रतीकसोबत डान्स करताना दिसणार आहे.