मुंबई :  प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिने नुकतंच असं वक्तव्य केलं आहे ज्यामुळे हिंदू धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तिने तिच्या ब्राच्या साईजवर बोलताच प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिने नुकतंच असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे हिंदू धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तिच्या ब्राच्या साईजवर बोलताच तिने देवाबद्दलही असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे लोक तिच्यावर संताप व्यक्त करत आहेत. या वादग्रस्त विधानाबाबत आता हिंदू संघटनेनेही मोर्चा काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्र्यांकडे केली FIR ची मागणी
या प्रकरणाबाबत संघटनेने मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडे श्वेता तिवारी आणि वेब सीरिजच्या दिग्दर्शकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. श्वेताने आपल्या वक्तव्याबद्दल जनतेची माफी मागावी, अन्यथा हिंदू संघटना भोपाळमध्ये वेब सीरिजचं शूटिंग होऊ देणार नाही. असा इशारा हिंदू संघटनेने तिला दिला आहे.


हिंदुत्ववादी नेत्याने दिलं निवेदन 
अभिनेत्री श्वेता तिवारीच्या वादग्रस्त विधानानंतर हिंदू संघटनेचे हिंदुत्ववादी नेते चंद्रशेखर तिवारी यांनी श्वेता तिवारीवर हिंदूंच्या भावना दुखावण्याचा आरोप केला आहे. त्यांनी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. भोपाळमध्ये त्यांच्या वेब सीरिजच्या शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही. असा हिंदू संघटनेचा यांच्याविरुद्ध ईशारा आहे.


काय आहे प्रकरण
 बुधवारी आगामी वेब सीरिजच्या कामानिमित्त ती भोपाळला पोहोचली होती.  जिथं सीरिजच्या संपूर्ण स्टारकास्टसोबतच्या एका पत्रकार परिषदेत ती सहभागी झाली होती. इथंच श्वेतानं असं वक्तव्य केलं की उपस्थितांसोबतच आता जे कोणी हे वाचत आहे त्यांनाही धक्का बसत आहे. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. श्वेता तिवारी म्हणाली, ' माझ्या ब्राची साईज देव घेत आहे'.  तिच्या या वक्तव्यापासून सोशल मीडियावर श्वेताला फटकारलं जात आहे. श्वेताने भोपाळमध्ये मीडियासमोर लोकांची मनं दुखावणारी ही गोष्ट बोलून स्व:ताला अडचणीत आणलं आहे.