मुंबई: ‘बाहुबली’ या चित्रपटातून विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता प्रभासविषयीची प्रत्येक गोष्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टारचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासच्या चाहत्यांनी तर या खास दिवसाच्या सेलिब्रेशनची तयारीही सुरु केली आहे.


इथे लक्ष देण्याची बाब म्हणजे यंदाच्या वाढदिवसादिवशी खुद्द प्रभासच चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचं कळत आहे. आता ते सरप्राईज कोणतं, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?


‘साहो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणारा प्रभास येत्या काळात त्याच्या लग्नाची घोषणा करु शकतो या चर्चांनी आता प्रचंड जोर धरला आहे.


तेव्हा ता खरंच प्रभास त्याच्या लग्नाविषयी कोणती अधिकृत घोषणा करतो का, हेच जाणून घेण्याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. काही चाहत्यांनी तर त्याची जोडीदार कोण असणार याविषयीसुद्धा तर्क लावण्यास सुरुवात केली आहे.


प्रभासची जोडीदार नेमकी कोण असेल, याविषयी तुमच्याकडे काही त्तर आहे? किंवा तुम्हीही कोणत्या नावाविषयी तर्क लावत आहात तर कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.