S S Rajamauli angry on Netfilx: गेलं अख्खं वर्ष हे दाक्षिणात्त्य चित्रपटांचे होतं. अगदी 'आरआरआर', 'पुष्पा', 'विक्रम' आणि 'केजीएफ 2' अशा प्रादेशिक म्हणजेच दाक्षिणात्त्य चित्रपटांनी अख्ख्या भारतात तसेच विश्वभरात विक्रम रचला. शंभर कोटी करत करत या चित्रपटांनी हजारो कोटीही कमावले. 'बाहूबली'नंतर 'आरआरआर' हा चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांची दुसरा सुपरडूपर हिट सिनेमा ठरला जो 1000 crore club मध्ये गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा या अद्भूत क्षणांचे साक्षीदार आपण सगळेच राहिलो होतो. दाक्षिणात्त्यच नाही तर मराठी प्रादेशिक चित्रपटांनीही तिकीटबारीवर मोठी कमाई केली. म्हणता म्हणता बॉलीवूड चित्रपटांना मागे टाकून हे प्रादेशिक चित्रपट त्यांचीही पुढे गेले. 


पण... आपल्या पदरी इतके यश असूनही दाक्षिणात्त्य दिग्दर्शकांपैंकी एक दिग्गज दिग्दर्शक मात्र सध्या नाराज झाले आहेत. ते म्हणजे एस. एस. राजमौली. आपले सलग दोन चित्रपट म्हणजे 'बाहूबली - 1, 2' आणि 'आरआरआर' हे 1000 crore club मध्ये पोहचले आणि एस. एस. राजमौली यांना मोठे यश मिळाले. 


'आरआरआर' हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता. देशात तसेच देशाबाहेर या चित्रपटाचे पुष्कळ कौतुक झाले आणि हा चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता परंतु हा चित्रपट नेटफ्सिक्ससारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर फक्त हिंदीतच प्रदर्शित झाला इतर चार भाषा म्हणजेच तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्ल्याळममध्ये हा चित्रपट का प्रदर्शित झाला नाही?, यावरून दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी आक्षेप घेतला आहे.  


एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, ''खरंतर मी नेटफ्लिक्सवर नाराज आहे कारण त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून  'आरआरआर' या चित्रपटाचं फक्त हिंदी व्हर्जनच आणले आहे. बाकीच्या चार भाषांमध्ये मात्र त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला नाही त्यामुळे माझी त्यांच्याविरूद्ध तक्रार आहे. मला याचाही आनंद आहे की नेटफ्लिक्सवर 'आरआरआर' प्रदर्शित झाल्यामुळे पाश्चात्त्य देशांनी खूप उचलून धरला याबाबत मी खुश आहे'', असेही त्यांनी म्हटले आहे. 


'आरआरआर' या चित्रपटात रामचरण, ज्यूनिअर एनटिआर आणि आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या प्रमुख भुमिका होत्या.