Devoleena Bhattacharjee Marriage : 'साथ निभाना साथिया' (Saath Nibhaana Saathiya)  मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. मालिकेत गोपी बहूच्या भूमिकेत साधी-सरळ दिसणारी देवोलीना रियल आयुष्यात मात्र प्रचंड बोल्ड आणि हॉट आहे. 'गोपी बहू'च्या भूमिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री गुपचून लग्न उरकत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देवोलीनाच्या (Devoleena Bhattacharjee New Photos) नवीन फोटोंनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कारण मेहंदी आणि गालावर  हळदी पाहून... चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee Haldi Ceremony Photos) चे हळदीचे फोटो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. एक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये टीव्ही अभिनेता विशाल सिंग आणि देवोलीना दोघे सोबत दिसत आहे. एवढंच नाही,तर देवोलीनाने मेहंदीचा फोटो इन्स्टास्टोरीवर पोस्ट केला आहे. 



महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वी देखील अभिनेत्री बॉयफ्रेंड विशाल सिंगसोबत (vishal singh) लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण तेव्हा या फक्त अफवा असल्याचं समोर आलं. आता देखील देवोलीना आणि विशाल खरंच लग्न करत आहेत की प्रसिद्धीसाठी अभिनेत्रीने नवरीच्या रुपात फोटो पोस्ट केलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Devoleena Bhattacharjee social media)


वाचा | Raj Kundra पोर्नोग्राफी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावला मोठा निर्णय


देवोलीना फक्त मालिका आणि बोल्ड-ग्लॅमरस (Devoleena Bhattacharjee photo) फोटोंमुळेच नाही, तर आपल्या बिंधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. देवोलीना प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडते. टीव्ही एक्ट्रेस देवोलीना अनेकदा आपल्या बिंधास्त अंदाजामुळे फेममध्ये आली आहे.