`सचिन अ बिलियन ड्रिम्स` सिनेमा जगभरात ५ भाषांमध्ये प्रदर्शित
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित `सचिन अ बिलियन ड्रिम्स` हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जगभरात हा सिनेमा तब्बल 4850 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. तर भारतात हा सिनेमा 4200 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ आणि तेलगू अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. जगभरात हा सिनेमा तब्बल 4850 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. तर भारतात हा सिनेमा 4200 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे.
मराठीत तब्बल 400 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ही डॉक्युफिल्म असून सचिनचा संपूर्ण प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. त्यामुळे नक्कीच सचिनच्या चाहत्यांना या सिनेमाविषय़ी प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळीने चाहत्यांना क्लीनबोल्ड करणा-या सचिनची ही नवी खेळी कितपत यशस्वी होते हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.