मुंबई : सचिन पिळगांवकर 'अशी ही आशिकी' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन पिळगांवकर यांनी या सिनेमांत फ्रेश जोडी घेतली आहे. आहेत. नावातच आशिकी असणाऱ्या या सिनेमातून यंग आणि फ्रेश लव्हस्टोरी समोर येणार असून अभिनय बेर्डे या आशिकीचे रंग प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. या चित्रपटातून हेमल इंगळे ही नवोदित अभिनेत्री चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन पिळगांवकर यांनी आपल्या साठाव्या वाढदिवशी चाहत्यांना नवा सिनेमा भेट देण्याचं आश्वासन देण्याचं सांगितलं आहे.  "अशी ही आशिकी"चं शूटिंग शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असून या सिनेमाची दोन गाणी आणि काही भाग शूट करण्यासाठी या सिनेमातील मंडळी थेट स्वित्झर्लंडला रवाना झाली आहे. स्वित्झर्लंडमध्ये मराठी सिनेमाचं शूटिंग करणारे सचिन पिळगांवकर हे पहिले दिग्दर्शक आहेत.  



सचिन पिळगांवकर यांनी आपल्या सोशल मीडियावरून अभिनयसोबतचा सेल्फी शेअर करत "अशी ही आशिकी" च्या शूटिंग दरम्यान अभिनय चा एकंदर वावर लक्ष्याबरोबर घालवलेले ते "अशी ही बनवाबनवी" चे दिवस ताजे करून गेल्याचं म्हटलं आहे. हा चित्रपट यावर्षी 14 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या निमित्ताने सरत्या वर्षात प्रेमाची नव्याने उजळणी होणार आहे.


या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गायक, निर्माता अशा विविध भूमिकांमध्ये दिसलेले सचिन पिळगांवकर आता आपल्याला संगीत दिग्दर्शकाच्या ही भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शनातील अनोख्या शैलीने गेली कित्येक वर्ष मराठी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सचिन पिळगांवकर या चित्रपटाच्यानिमित्ताने तब्बल पाच वर्षांनी पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून आपल्या समोर येत आहेत.