मुंबई : 'नदिया के पार' फेम सचिन पिळगांवकर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 मुंबईत झाला. महत्वाची बाब म्हणजे सचिन यांचा वाढदिवस ते त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत आपला वाढदिवस शेअर करतात. सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस 17 ऑगस्ट रोजी असून ते आपली पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरसोबत वाढदिवस शेअर करतात. सुप्रिया यांचा जन्म 1967 मध्ये झाला आहे. दोघांच्या वयात 10 वर्षाचा फरक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन यांनी वयाच्या 4 व्या वर्षी अभिनयात डेब्यू केला आहे. आपल हास्य आणि अभिनयातून सचिन यांनी वेगळी ओळख निर्माण केली. सचिन यांचा पहिला सिनेमा 'हा मजा मार्ग एकला' हा सिनेमा मराठीत देखील तयार करण्यात आला. सचिन यांनी बाल कलाकार म्हणून 65 सिनेमांत काम केलं आहे. लीड रोल म्हणून सचिन यांनी बालिका वधू (1976) या सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर राजश्री प्रोडक्शनच्या 'गीत गाता चल' या सिनेमातून ओळख मिळाली. सचिन यांच्या कारकिर्दितील लोकप्रिय सिनेमे म्हणजे अखियों के झरोके से आणि नदिया के पार हे दोन सिनेमे हिट ठरले. त्यानंतर 1994 मध्ये नदीया के पार याचा रिमेक "हम आपके है कोन' हा सुपरहिट सिनेमा ठरला आहे. 


शोले, त्रिशूल, सत्ते पर सत्ता सारख्या सिनेमांत सचिन यांनी छोटा रोल केला पण महत्वाची भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन यांनी सचिन यांना आपल्या लहान भावासारखं प्रेम दिलं. सचिन आणि अमिताभ अनेक सिनेमात एकत्र दिसले आहेत. सचिन यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.