Sachin Pilgaonkar meets Junior Mehmood : अभिनय आणि कॉमेडीनं 1970 गाजवणारे ज्युनियर महमूदची गेल्या काही दिवसांपूर्वी स्टेज 4 कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली होती. ते यकृत आणि फुफ्फुसात कॅन्सरचा सामना करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. दरम्यान, दिग्गज अभिनेता जितेंद्र यांनी  ज्युनियर महमूद यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कॉमेडियन जॉनी लिव्हर देखील दिसले. ज्युनियर मेहमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सचिन पिळगावकरांनी ज्युनियर मेहमूद यांना व्हिडीओ कॉल केला होता. दरम्यान, आता त्यांनी जाऊन भेट घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर रुग्णालयातून घरी जात असताना ज्युनियर महमूदनं एनडीटीव्हीशी चर्चा करत असताना त्यांची अखेरची इच्छा सांगितली. त्यावेळी ते म्हणाले की मी जेव्हा नसेन तेव्हा जगानं बोलायला हवं की तो व्यक्ती म्हणून खूप चांगला होता. चार लोक जरी म्हणाले तरी मला जग जिंकल्यासारखं वाटेल. ज्युनियर महमूद यांनी त्यांचा मित्र सलाम काजीला सांगितले की ते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटायचं आहे. ज्युनियर महमूद यांच्या विषयी ऐकताच जॉनी लिव्हर आणि मास्टर राजू यांच्या भेटीस गेले. 



हेही वाचा : जितेंद्र यांनी पूर्ण केली ज्युनिअर महमुद यांची 'ही' इच्छा, अवस्था पाहून अश्रू अनावर


ज्युनियर महमूद यांच्याविषय न माहित असलेल्या गोष्टी


ज्युनियर मेहमूद यांनी वेगवेगळ्या भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभ्यासात करायला आवडत नसल्यानं त्यांनी अभियनयाकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. रतन भट्टाचार्य यांच्या 'सुहागरात' चित्रपटात महमूद यांच्या मेहुण्याची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ज्युनियर मेहमूद हे 'कटी पतंग', 'ब्रह्मचारी', 'मेरा नाम जोकर' आणि 'परवरिश' यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत.