मुंबई : क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकरसोबत, त्याच्या मुलीचीही सर्वत्र चर्चा असते. सचिनची मुलगी सारा तेंडूलकर सोशल मीडियावर खुपच सक्रिय असते. ती आपल्या सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही ना काही अपलोड करत असते. नुकतेच तिने मॉडलींगच्या दुनियेत पदार्पण केलं आहे. ज्यामुळे ती सर्वात जास्त चर्चेत आली. ज्यानंतर सारा आपल्या आयुष्यात काय करते? हे जाणून घेण्यासाठी बरेच लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साराने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिचा असा फोटो ठेवला होता, ज्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल.


साराने तिच्या चेहऱ्यावर डाग असलेला फोटो स्टोरीला पोस्ट केला आणि लिहिलं की, "10 वर्षांपासून कॉनस्टंट ठेवल्यामुळे माझी त्वचा बरी झाली आहे आणि आज ती बदलली आहे."


साराच्या या पोस्टवरुन असा अर्थ काढला जात आहे की, मागिल काही काळापासून सारा कोणत्यातरी स्किन रिलेटेड प्रॉबलमशी झुंज देत होती. जी आता बरी झाली आहे. परंतु सारा याबद्दल उघड असं काहीही सांगितलेलं नाहीय.



नुकत्याच संपलेल्या IPL 2022 च्या मोसमात, सारा देखील स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसली. तेथे देखील तिची बरीच चर्चा झाली.