लग्नापूर्वीच Shubman Gill बद्दल सचिन तेंडुलकरकडून मोठं वक्तव्य म्हणाला...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने सध्या मॉडलिंगच्या विश्वात पाऊल ठेवलं आहे.
मुंबई : क्रिकेटच्या विश्वातील देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. आजच्या काळात संपूर्ण जगाचा तो चाहता आहे. सचिन तेंडुलकरबद्दल सांगायचे तर, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने जितक्या धावा केल्या आहेत, तितक्या आजपर्यंत इतर कोणत्याही क्रिकेटपटूने केलेल्या नाहीत. यामुळेच सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सध्या क्रिकेट खेळत नसला तरी त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर.
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने सध्या मॉडलिंगच्या विश्वात पाऊल ठेवलं आहे. ज्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तसेच सोशल मीडियावर चर्चा होण्यामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे साराचा बॉयफ्रेंड.
सध्या सारा ज्या तरुणाला डेट करत आहे तो मुलगा देखील एक क्रिकेटर आहे आणि तो सचिन तेंडुलकरला त्याचा खेळ फार आवडतो. तसेच शुभमन गीलला भारतीय संघाचे भविष्य असल्याचे म्हटले आहे.
सध्या साराचे नाव भारतीय क्रिकेटर शुभमन गीलसोबत जोडले जात आहे. ज्याची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरु असते. सध्या दोघांचा बिचवरील फोटो सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरत आहे.
तर आता सचिनने आपल्या होणाऱ्या जावयाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
सचिन तेंडुलकरने शुभमन गिलबद्दल बोलताना म्हणाला की, "शुभमन गिल हा भारतीय संघाचे भविष्य आहे, कारण शुभमनमध्ये प्रतिभेची कमतरता नाही, फक्त आत्मविश्वास आणि दाखवण्याची गरज आहे." यावरून सचिन तेंडुलकरला त्याची मुलगी सारा तेंडुलकरचा बॉयफ्रेंड शुभमन गिल किती आवडतो हे तुम्हाला समजलं असेलचं.