मुंबई : 'सेक्रेड गेम्स२' मधील कहणी एक वेगळे वळण घेणार आहे. ‘बिच्छु हैं.... अपनी कहानी चिपक गयी है आपको!’ असं म्हणत आपली गोष्ट सांगणारा गणेश गायतोंडे पुन्हा परत येत आहे. त्यामुळे दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'सेक्रेड गेम्स२' या वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.‌हा ट्रेलर‌ पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या वेब सीरिजबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांमध्ये आणखी या वेब सीरिजची उत्सुकता अशीच‌ ताणून धरण्यासाठी नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवरुन ‘सेक्रेड गेम्स २’चा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या‌ व्हिडिओमध्ये गायतोंडे आणि सरताज सिंग एकमेकांच्या समोर येणार आहेत. 'सेक्रेड गेम्स २’च्या नव्या सीझनमध्ये अनेक प्रश्नांची प्रेक्षकांना उत्तर मिळणार आहेत. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ‘भगवान को मानते हो, पर कभी सोचा है की भगवान किसको मानता है?’, असं म्हणणाऱ्या गायतोंडेच्या या वाक्यामध्ये अनेक गोष्टींचा अर्थ दडलेला आहे.