मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने १५ एप्रिल रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिने मुलीचं नाव 'ईवा' असं ठेवलं आहे. मुलीच्या जन्माने सुरवीन अतिशय खूश असून मी हा आनंद शब्दात व्यक्त करु शकत नसल्याचं सुरवीरने म्हटलं आहे. सुरवीनने सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवरुन मुलीचा फोटो शेअर केला आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरवीनने बेबी बंपसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सुरवीन चावलाने अक्षय ठक्करसोबत २०१५ साली लग्नगाठ बांधली. सुरवीन आणि अक्षयने अगदी अचानक गुपचूप लग्न करुन सर्वांना धक्का दिला होता. २०१७ मध्ये त्यांनी लग्नाबाबत खुलासा केला. 




सुरवीनने एकदा कपूरच्या 'कही तो होगा' मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. या मालिकेतील सुरवीनची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर ती 'कसौटी जिंदगी की' मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. सुरवीनने अनिल कपूरच्या शो २४ आणि वेब सीरीज 'हक से' मधूनही काम केलं आहे. टिव्हीनंतर सुरवीन बॉलिवूडकडे वळली. हेट स्टोरी २, पार्च्ड, उंगली यांसारख्या चित्रपटातून तिने काम केलं आहे. गेल्या वर्षी आलेल्या नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित सेक्रेड गेम्स सीरीजमधून तिने काम केलं आहे.