सागर म्हात्रे ठरला `इंडियन आयडॉल मराठी`च्या पहिल्या पर्वाचा विजेता
महाराष्ट्राला आणि देशाला पहिला मराठी इंडियन आयडॉल मिळाला आहे. पनवेलचा सागर म्हात्रे (Sagar Mhatre) हा इंडियन आयडॉल (indian idol marathi) मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
मुंबई : अखेर मराठी इंडियन आयडॉलचा (Indian Idol Marathi ) विजेता कोण होणार, या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्राला आणि देशाला पहिला मराठी इंडियन आयडॉल मिळाला आहे. पनवेलचा सागर म्हात्रे (Sagar Mhatre) हा मराठी इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला आहे. सागर मराठी इंडियन आयडॉल ठरल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. सागरवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. (sagar mhatre won 1st season of indian idol marathi)
महाअंतिम सोहळ्यातील टॉप 5 मध्ये प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, जगदीश चव्हाण, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले यांनी धडक मारली होती. मात्र सागरने या चौघांना पछाडत मराठी इंडियन आयडॉल होण्याचा मान पटकावला.
सागरबाबत थोडक्यात?
सागर हा पेशाने इंजिनिअर आहे. मात्र गाण्याची आवड त्याला आज इथवर घेऊन आली. सागरने या पर्वाच्या सुरुवातीपासून ते अगदी महाअंतिम सोहळ्यापर्यंत आपल्या गोड आवाजने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. सागरने त्याच्या प्रेक्षकांचं आणि चाहत्यांचंही भरभरुन मनोरंजन केलं.
दरम्यान मराठमोळा अभिजित सांवत हा इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्यानंतर अभिजितची कारकिर्द खऱ्या अर्थाने बहरली होती.