मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील आणखी एक कपल आई-बाबा होणार आहेत. या सेलिब्रिटी जोडीने आपले काही फोटोज शेअर केले आहेत. स्मॉल स्क्रिनवरील अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू साळवीने चाहत्यांसोबत ही गुड न्युज शेअर केली आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत खुशबू आणि संग्रामने काही फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे.  "आम्ही आमच्या कुटुंबात आणखी थोडं प्रेम अ‍ॅड करत आहोत." हे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संग्राम अलीकडेच आई माझी काळूबाई मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कपलच्या फोटोवर सुयश टिळक, गौरी नलवडे, हृता दुर्गुळे, तेजस्विनी पंडीत, श्रेया बुगडे सह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन करणाऱ्या कमेंट केल्या आहेत. याशिवाय अभिज्ञा भावेने अगदी हटके कमेंट केली आहे. अभिज्ञा म्हणते,  "फायनली. सिक्रेट इज आऊट आता आपण पब्लिकली यावर बोलू शकतो. अभिनंदन. लव्ह यु" अशी कमेंट केली आहे.



खुशबू तावडे हिने अनेक मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तर संग्राम आणि तिच्या रोमॅन्टिक अंदाजातील फोटो देखील कमालीचे चर्चेत असतात.