चला हवा येऊ द्याच्या मंचावर अवतरले `सही रे सही`मधील पात्र
मुंबई : भरत जाधव यांचं 'सही रे सही' हे नाटक गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याच नाटकातील पात्र आपल्याला झी मराठीवरील चला हवा येऊ द्याच्या मंचावर येणार आहेत. आपल्याला माहितच आहे चला हवा येऊ द्या हे मंच आता प्रमोशनच हक्काच ठिकाण झालं आहे. या मंचावर अनेक मराठी आणि बॉलिवूडचे सिनेमे प्रमोशनला येतात. आता या मंचावर महाराष्ट्राला खळखळून हसवणारे भरत जाधव आणि संजय नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.
संजय नार्वेकर आणि भरत जाधव आपल्या नाटकाच्या प्रमोशन्ससाठी चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले. भरत जाधव म्हटलं की गळगळे हे कॅरेक्टर आठवतं. भरत जाधवचं सही रे सही हे नाटक अजरामर आहे. आजही या नाटकावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. तर या दोघांच्या उपस्थितीत चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी सही रे सही हे नाटकं सादर केलं. थुकरटवाडीमध्ये ही धम्माल पाहायला मिळाली.